ब्रह्मपुरीतील अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:01:09+5:30

सदर अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत ब्रम्हपुरी-नागभीड रोडला लागून असलेल्या शतायु रुग्णालयाजवळून क्रीडा संकुलाकडे जाणारा ७५० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याचे काम न.प.ने हाती घेतले होते. मात्र या मार्गावर लगतच्या बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले असल्याने रोडचे काम थांबले होते.

A bulldozer ran over the encroachment in Brahmapuri | ब्रह्मपुरीतील अतिक्रमणावर चालला बुलडोजर

ब्रह्मपुरीतील अतिक्रमणावर चालला बुलडोजर

ठळक मुद्देरस्ते केले रुंद : पक्की बांधकामे पाडली

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी अंतर्गत रस्त्यावर घराचे, दुकान गाळ्यांचे, रुग्णालयाचे नव्याने बांधकामे करताना अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. त्यामुळे नवीन रस्त्याचे खडीकरण तसेच डांबरीकरण करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच वाहतुकीलादेखील अडथळा होत होता. अपघाताचीसुद्धा शक्यता बळावली होती. त्यामुळे सदर अडचणी दूर करण्यासाठी नगरपालिकेने या अतिक्रमण बुलडोजर चालवत रस्ते रुंद करणे सुरू केले आहे.
सदर अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत ब्रम्हपुरी-नागभीड रोडला लागून असलेल्या शतायु रुग्णालयाजवळून क्रीडा संकुलाकडे जाणारा ७५० मीटर लांबीचा व १८ मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याचे काम न.प.ने हाती घेतले होते. मात्र या मार्गावर लगतच्या बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले असल्याने रोडचे काम थांबले होते. त्यामुळे पालिकेने चार-पाच दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन या मार्गावर असलेली पक्की बांधकामे जेसीबीच्या साहायाने हटविणे व पाडणे सुरू केले आहे. सदर रस्ता मोकळा करण्यात येत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर लगेच सदर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असून याचा फायदा नागरिकांनाच होणार असल्याचे सांगितले आहे.

वस्तीतील अतिक्रमणेही काढणार
रस्त्यांसोबतच शहरातील विविध भागातसुद्धा ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण करून पक्की बांधकामे केली आहेत, त्या ठिकाणीसुद्धा बुलडोजर चालविला जाणार असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमण करून पक्की बांधकामे करण्यात आली असतील तर नागरिकांनी स्वत:हून काढून टाकावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: A bulldozer ran over the encroachment in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.