ब्रह्मपुरी येथील इमारत बांधकाम वादात

By Admin | Updated: March 15, 2015 01:04 IST2015-03-15T01:04:32+5:302015-03-15T01:04:32+5:30

येथील शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स ज्या जागेवर उभारण्यात येत आहे. त्या इमारतीच्या मूळ जागेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Building construction issue at Brahmapuri | ब्रह्मपुरी येथील इमारत बांधकाम वादात

ब्रह्मपुरी येथील इमारत बांधकाम वादात

ब्रह्मपुरी : येथील शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स ज्या जागेवर उभारण्यात येत आहे. त्या इमारतीच्या मूळ जागेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात आहे.
सन १९५१-५२ ते १९५५-५६ ब्रह्मपुरी ब.क. ३५२ प.ह.नं. १९ नंबर ५१० क्षेत्रपळ ०-४१ मध्ये कॉम्प्लेक्सची जागा ही सरकारी मालकीचे असल्याची नोंद आहे. १९५६-५७ ते १९६०-६१ खसरामध्ये सदर जमिन मालकी सरकारी नोंद असून शेरा मध्ये आखर व शेणाचे खड्डे असल्याची नोंद आहे. जमिनीचे २४ फेब्रुवारी २०७२ ला चौकशी पंजीनुसार कोतवाल बाळकृष्ण वातूजी यांनी चौकशी करून त्यांनी आनंदराव नागोराव डबली यांनी घेतल्याचे समजते. परंतु चौकशी समयी सरकारी जमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे नमूद केल्यावरही आनंदराव नागोराव डबली हे या जागेचे मालक कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारी मालकी असलेली जमिन डबली नामक इसमाला सरकारने का दिली. शासकीय नियमानुसार डबली हे भूमीहीन नव्हते तर, भूमीस्वामी असताना त्यांच्या नावावर ही जमिन कशी, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे.
जागेच्या मुळ मालकासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने सदर कॉम्प्लेक्स वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Building construction issue at Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.