सशक्त समाजाची निर्मिती करा - पुगलिया
By Admin | Updated: December 13, 2015 00:56 IST2015-12-13T00:56:51+5:302015-12-13T00:56:51+5:30
सशक्त व सुदृढ समाजाची गरज असून देशाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर स्वस्थ समाजाची निर्मिती झाली पाहिजे, ...

सशक्त समाजाची निर्मिती करा - पुगलिया
राजुरा : सशक्त व सुदृढ समाजाची गरज असून देशाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर स्वस्थ समाजाची निर्मिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी व्यक्त केले.
स्टेला मॉरीस कॉन्व्हेंट बामनवाडा येथे आयोजित ‘रक्षा’ या स्वास्थ संघटनेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.श्रीराम गोगुलवार, तहसीलदार धर्मेश फुसाटे, डॉ. मंगेश गुलवाडे, सुनील चोपडे, डॉ. बाबा कल्लूरवार, नगरसेवक अशोक नागापूरे, फादर वर्गीस उपस्थित होते.
प्रास्ताविक सिस्टर सिना यांनी केले. संचालन राजीवकुमार यांनी केले. आभार सिस्टर रिता यांनी मानले. यावेळी पथसंचलनाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. (शहर प्रतिनिधी)