महामार्गावर सुशोभीकरण, उड्डाणपुलाचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST2022-04-09T05:00:00+5:302022-04-09T05:00:24+5:30
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपुलाचे निर्माण करण्याबाबत आपल्या विभागाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार व शीघ्रगतीने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोठारी गावातुन गेले आहे.

महामार्गावर सुशोभीकरण, उड्डाणपुलाचे बांधकाम करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपूल निर्माण करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपुलाचे निर्माण करण्याबाबत आपल्या विभागाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार व शीघ्रगतीने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोठारी गावातुन गेले आहे. येथे दुभाजकामध्ये स्ट्रीटलाईट व कोठारी नाल्यापर्यंत नाली बांधकामाचे मागणी केली आहे. मुल शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे सुशोभीकरण करावे, चंद्रपूर-बल्लापूर-बामणी-राजुरा-देवाडा-लक्कडकोट-राज्यसीमा ते तेलंगणा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करणे सुरू आहे. चंद्रपूरस्थित दाताळाजवळील इरई नदीवर बनविलेल्या पुलासारखे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) स्थित वर्धा नदीवर ब्रिज कम बॅरेजचे बांधकामाची मागणी केली.