दहा दिवसांत पूल उभारा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST2021-07-27T04:29:42+5:302021-07-27T04:29:42+5:30

लिंगनडोह ते आसापूर या मार्गावर दोन पूल आहेत आणि त्या दोन्ही पुलांवर महापुरामुळे मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता पण ...

Build the bridge in ten days, otherwise agitation | दहा दिवसांत पूल उभारा, अन्यथा आंदोलन

दहा दिवसांत पूल उभारा, अन्यथा आंदोलन

लिंगनडोह ते आसापूर या मार्गावर दोन पूल आहेत आणि त्या दोन्ही पुलांवर महापुरामुळे मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता पण वाहून गेला आहे. विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, लगेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून पुलाचे काम दहा दिवसांच्या आत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्या मार्गाने कोणतेही चारचाकी वाहन जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तोच मार्ग आहे. कोणतेही माल शेतात ने-आण करतो म्हटले म्हणजे त्या मार्गाशिवाय पर्याय नाही. दहा दिवसांच्या आत पुलाचे काम पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे.

260721\img-20210726-wa0103.jpg

लिंगनडोह ते पेदाआसापूर मार्गावरील तुटलेला पूल

Web Title: Build the bridge in ten days, otherwise agitation