‘बसपा’तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:47+5:302021-02-20T05:23:47+5:30

अध्यक्षस्थानी बामसेफचे मीडिया प्रभारी प्रा.भारत मेश्राम होते. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डाॅ. राजेश डहारे, ॲड. प्रतिभा मोहुर्ले, ‘बसपा’चे नंदू खोब्रागडे ...

BSP felicitates dignitaries from various fields on the occasion of Shiv Jayanti | ‘बसपा’तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

‘बसपा’तर्फे शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

अध्यक्षस्थानी बामसेफचे मीडिया प्रभारी प्रा.भारत मेश्राम होते. प्रमुख मार्गदर्शक प्रा. डाॅ. राजेश डहारे, ॲड. प्रतिभा मोहुर्ले, ‘बसपा’चे नंदू खोब्रागडे व शीतल शेंडे मंचावर उपस्थित होते. या अभिवादन व गुणगौरव कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व मालार्पणाने करण्यात आले. यावेळी पीएच.डी.प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल, गुंजेवाहीचे अध्यापक डाॅ. प्रेमकुमार खोब्रागडे, राज्यस्तरीय साहित्यिक व कवयित्री पुरस्कार विजेती भावना खोब्रागडे - अलोने सिंदेवाही, डोंगरगाव (सा.)च्या बसपाच्या नवनिर्वाचित उपसरपंच शिल्पा सचिन बनसोड, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली सर्वोदय काॅलेजची विद्यार्थिनी करिना अनिल साखरे व जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा विजेती सर्वोदय कन्याशाळेची विद्यार्थिनी अर्पिता दुर्गादास रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. भारत मेश्राम यांनी संचालन केले, तर शीतल शेंडे यांनी आभार मानले.

Web Title: BSP felicitates dignitaries from various fields on the occasion of Shiv Jayanti