बीएसएनएलमध्ये सव्वा लाखांची चोरी
By Admin | Updated: March 15, 2015 01:01 IST2015-03-15T01:01:36+5:302015-03-15T01:01:36+5:30
येथील बीएसएनएल कार्यालयातील बॅटरी चार्जिंग रुममधील इलेक्ट्रीकल मॉड्यूलरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

बीएसएनएलमध्ये सव्वा लाखांची चोरी
भद्रावती : येथील बीएसएनएल कार्यालयातील बॅटरी चार्जिंग रुममधील इलेक्ट्रीकल मॉड्यूलरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यात १ लाख २५ हजाराचा माल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
येथील उपविभागीय अभियंता प्रमोद पाडेवार यांनी घटनेची तक्रार पोलिसात दिली. ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोरट्याच्या छडा लावला. सव्वालाख रुपयाच्या मुद्देमालासह वरोरा येथील यात्रावॉर्डातील रहिवासी पोचन्ना गणपत घोडमारे (२०) याला अटक केली. त्याच्यासोबत अन्य एका बालगुन्हेगाराचाही समावेश आहे. त्यांनी बीएसएमल कार्यालयात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. (शहर प्रतिनिधी)