शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, रामपूर जंगलातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:25 IST

सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून होता बेपत्ता

सास्ती (चंद्रपूर) : राजुरा शहरालगत रामपूर जंगलात एका युवकाची अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. संदीप देवराव निमकर (२८, रा. रामपूर, राजुरा) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून हा युवक बेपत्ता होता, अशी माहिती पुढे आले आहे.

रामपूर येथे संदीप निमकर हा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री ८ वाजता घराबाहेर गेला. मात्र, परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पण कुठेही पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात दिली. कुटुंबाने संदीपचा शोध सुरू ठेवत असतानाच तो मित्रांसोबत जंगलात जात असल्याची माहिती मिळाली.

नागरिकांच्या सहकार्याने नातेवाईक रामपूरलगत जंगलातील माथरा मार्गावर शोध घेत असताना एका झुडपात संदीपचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे, ठाणेदार योगेश पारधी यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

नागरिकांत शंका-कुशंका

राजुरा शहरालगत रामपूर वस्तीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नं. ३ येथे झालेल्या खुनात रामपूर वस्तीत राहणारे आरोपी निघाले होते. या परिसरात डिझेल, कोळसा व भंगार चोरीच्या घटना घडत असतात. सोबतच जुगार व सट्टा चालतो. यामध्ये बरेच युवक गुरफटले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर