लाचखोर शिक्षक एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 27, 2015 01:22 IST2015-08-27T01:22:19+5:302015-08-27T01:22:19+5:30
शिक्षक पदावर नियुक्त करण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

लाचखोर शिक्षक एसीबीच्या जाळ्यात
नागभीड : शिक्षक पदावर नियुक्त करण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुधीर गिरडे (५४) नामक सहायक शिक्षकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. हे प्रकरण काही महिन्यांपूर्वीचे आहे.
तालुक्यातील मिंडाळा या गावात संत हरदास विद्यालयात तक्रारकर्त्यास शिक्षक पदावर लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या आधारावर संस्थेचे अध्यक्ष अशोक खंडाळे व प्राचार्य मुनघाटे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात या प्रकरणातत सहायक शिक्षक सुधीर गिरडे यांचाही हात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)