सावली येथे धाडसी दरोडा

By Admin | Updated: March 3, 2016 01:03 IST2016-03-03T01:03:05+5:302016-03-03T01:03:05+5:30

२ मार्चच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी सावली येथील ओम ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने ...

Brave robbery at shadow | सावली येथे धाडसी दरोडा

सावली येथे धाडसी दरोडा

ज्वेलर्स फोडले : १२ तासात आरोपी ताब्यात
सावली : २ मार्चच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी सावली येथील ओम ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून सुमारे एक लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. सावली पोलिसांनी अवघ्या बारा तासात तीन चोरट्यांना जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाच्या कर्तबगारीवर समाधान व्यक्त केले जात आहे.
२ मार्चच्या रात्री १ वाजताच्या सुमारास गजबजलेल्या परिसरात असलेल्या व्यंकटेश मंदिराजवळील अनिल विनायक कनपत्तीवार यांच्या मालकीच्या ओम ज्वेलर्सचे कुलूप फोडून असल्याची बाब सकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दुकानात पाहिले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडून होते. त्यात २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बेसर, २५ हजार रुपयांचे सोन्याचे डोरले, तीन किलो चांदीच्या पायपट्ट्या, कडे आणि चाळ व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख ७५ हजार रुपयाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. रात्री १ वाजतादरम्यान सावली येथील इसम शौचास गेला असता त्यांना लेंढार बोडी परिसरात असलेल्या विहिरीकडे तीन इसम काहीतरी करीत असताना आढळले आणि सकाळीच सदर घटना उघडकीस आली. त्यात आरोपीमधील जगदीश कान्हुजी लेनगुरे (३५) हा सावली येथीलच असून सध्या मूल तालुक्यातील फिस्कुटी येथे राहायला गेला होता. त्याला ओळखत असल्यामुळे त्याचा शोध घेऊन उर्वरित दोन आरोपी बबलू तेजराम जाधव (३५) व प्रितम जाठ (३८) दोन्ही रा. गाल्हेर (मध्य प्रदेश) या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला असून याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात सावलीचे ठाणेदार व्ही.डी. निरुप, सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. साखरे, सहायक फौजदार परशुराम यादव, शिपाई सुनील बद्दलवार यांनी परिश्रम घेतले. (तालुुका प्रतिनिधी)

Web Title: Brave robbery at shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.