ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील ‘तो’ खड्डा त्वरित बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:56 IST2019-09-02T00:56:14+5:302019-09-02T00:56:54+5:30

यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Brahmapuri-Wadsa route was immediately clared | ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील ‘तो’ खड्डा त्वरित बुजविला

ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील ‘तो’ खड्डा त्वरित बुजविला

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी-वडसा मार्गावरील नवेगाव या गावाजवळ जीवघेणा खड्डा पडला होता. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता मिश्रा यांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रविवारी सकाळपासून सदर रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात सुरुवात करण्यात आली.

Web Title: Brahmapuri-Wadsa route was immediately clared