ब्रह्मपुरी तालुका ‘दालन’ पुरवणी प्रकाशन सोहळा
By Admin | Updated: June 25, 2017 00:33 IST2017-06-25T00:33:50+5:302017-06-25T00:33:50+5:30
लोकमत ‘दालन विकासाचे’ ब्रह्मपुरी तालुका पुरवणी सोहळ्याचे प्रकाशन स्थानिक कम्फर्ट मिटिंग हॉल येथे शनिवारी करण्यात आले.

ब्रह्मपुरी तालुका ‘दालन’ पुरवणी प्रकाशन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : लोकमत ‘दालन विकासाचे’ ब्रह्मपुरी तालुका पुरवणी सोहळ्याचे प्रकाशन स्थानिक कम्फर्ट मिटिंग हॉल येथे शनिवारी करण्यात आले.
‘लोकमत’ने वृत्तपत्रासोबत अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केल्याने महाराष्ट्रात व गोवा राज्यात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. दालन विकासाचे २०१७ ही पुरवणी तालुक्याच्या विकासावर तसेच उल्लेखनीय बाबींवर प्रकाश टाकणारी आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा योगिता बनपूरकर, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, नायब तहसीलदार सुभाष पुंडेकर, लोकमत सखी मंच संयोजिका साधना केळझरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. मोहन वाडेकर, प्रास्ताविक तालुका प्रतिनिधी प्रा.डॉ.रवी रणदिवे, तर आभार प्रदीप बिजवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रवी लोखंडे, प्रमोद फटींग, आकाश लोखंडे, राज शेंडे यांनी परिश्रम घेतले. लोकमत सखी मंचच्या माजी संयोजिका व सखी मंचच्या सदस्या उपस्थित होते.