पोलीस हवालदाराने मारल्याने मुलगा घरून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:45+5:302021-02-20T05:21:45+5:30

जिवती: वडिलाला पोलिसांनी पकडून नेल्याने ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आलेल्या मुलाला पोलीस हवालदाराने अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली. यामुळे अस्वस्थ ...

The boy went missing after being beaten by a police constable | पोलीस हवालदाराने मारल्याने मुलगा घरून बेपत्ता

पोलीस हवालदाराने मारल्याने मुलगा घरून बेपत्ता

जिवती: वडिलाला पोलिसांनी पकडून नेल्याने ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आलेल्या मुलाला पोलीस हवालदाराने अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली. यामुळे अस्वस्थ झालेला मुलगा घरून निघून गेला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

याबाबत जिवती पोलीस ठाण्यात वडील बाबू पवार यांनी तक्रार दाखल केली आहे.

प्रताप बाबू पवार (१८) हे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी ४.४० वाजता जिवती पोलिसांनी बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेल्याची माहिती मुलाला मिळताच प्रताप ठाण्यात विचारपूस करण्यासाठी गेला. त्याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली व मारहाणही करण्यात आली. त्यामुळे मी घर सोडून जात असल्याचे त्यांनी एका वहीवर लिहून ठेवले व तो घरून निघून गेला. आपला मोबाईलसुध्दा त्याने घरीच ठेवल्याने घरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांना सोडविण्यासाठी प्रतापने सात हजार रुपये नेले होते. पोलिसांमुळे माझा मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप आईने केला असून माझा मुलगा मला परत आणून द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोट

आईवडिलांनी मुलाची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाचा शोध घेऊन मुलगा परत आल्यावर त्या मुलावर अन्याय झाला असेल तर संबंधितावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- संतोष अंबिके, सहायक पोलीस निरीक्षक, जिवती

Web Title: The boy went missing after being beaten by a police constable