वरोऱ्यातील दोघांनी दाखविला प्रामाणिकपणा
By Admin | Updated: March 19, 2015 00:55 IST2015-03-19T00:55:56+5:302015-03-19T00:55:56+5:30
दिवसागणिक चोऱ्या घरफोड्या, अवैध कामे करून पैसे कमविण्याचा गोरधंदा सर्वत्र दिसून येतो. सामाजिकपणा असलेला शब्द लोप पावल्याचे वेळोवेळी जाणवते.

वरोऱ्यातील दोघांनी दाखविला प्रामाणिकपणा
वरोरा : दिवसागणिक चोऱ्या घरफोड्या, अवैध कामे करून पैसे कमविण्याचा गोरधंदा सर्वत्र दिसून येतो. सामाजिकपणा असलेला शब्द लोप पावल्याचे वेळोवेळी जाणवते. रोख रक्कम व सोने तसेच इतर साहित्य असलेली पर्स रस्त्याच्या कडेला पडून असताना ती घेवून पोलीस ठाणे गाठून दोन व्यक्तींनी पोलिसांच्या समक्ष महिलेला स्वाधीन केले. त्यांनी प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.
वरोरा शहरातून आनंदवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या शेजारी एक पर्स आढळून आली. सदर पर्स एकजण उचलत असल्याचे नंदकिशोर हरणे व दिलीप वर्भे यांना दिसले. या दोघांनी त्याला हटकले असता त्यान पर्स या जागेवर सोडून पळून गेला.
नंदकिशोर व दिलीपने ती पर्स ताब्यात घेऊन पहाणी केली असता पर्समध्ये चार ते पाच हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी संच, एटीएम असा बराच ऐवज आढळून आला. त्यामुळे पर्स घेऊन दोघांनाही पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांची भेट घेवून पर्स त्यांच्याकडे दिली. त्या कालावधीत पर्स हरविली असल्याचा दूरध्वनी पोलीस ठाण्यामध्ये आला. पर्स हरविलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात पर्स मिळालेली असल्याचा संदेश देत पोलीस स्टेश्नमध्ये पाचारण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)