बॉयलर मेंटनन्सचा निविदा घोटाळा

By Admin | Updated: July 6, 2015 00:46 IST2015-07-06T00:46:31+5:302015-07-06T00:46:31+5:30

कंपन्यांमधील मोठ्या कामांचे कंत्राट केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार देणे अपेक्षित असताना..

Boiler Maintenance Tender Scam | बॉयलर मेंटनन्सचा निविदा घोटाळा

बॉयलर मेंटनन्सचा निविदा घोटाळा

एकाच कंपनीवर मेहेरनजर : प्रहार संघटनेकडून चौकशीची मागणी
चंद्रपूर : कंपन्यांमधील मोठ्या कामांचे कंत्राट केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार देणे अपेक्षित असताना चंद्रपुरातील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील बॉयलर दुरूस्तीच्या कामांच्या कंत्राटात मात्र हे नियम डावलल्याचा आरोप होत आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा करून एकाच कंपनीला वारंवार कामाचे कंत्राट दिले जात असून यात करोडो रूपयांची गैरप्रकार घडत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेतून केला आहे. मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही बाब कागदोपत्री स्पष्ट दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुनील हायटेक कंपनीला २०१० ते २०१४ या काळात तब्बल ८८ कामे दिली आहेत. या कामांची किंमत ३० कोटी रूपये आहे. निविदा पद्धतीमध्ये अन्य कंपन्यांच्या निविदा असतानाही एकाच कंपनीला लागोपाठ निविदा मिळणे हा प्रकार संशयास्पद असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. या संदर्भात ते म्हणाले, सुनील हायटेक कंपनीला २०१० मध्ये बॉयलर मेटनन्स स्टेज-एकची एकूण पाच कामे दिली होती. त्याची एकूण किंमत एक कोटी १३ लाख ६२ हजार ५०८ रूपये होती. बॉयलर मेंटनन्स स्टेज दोनचे काम १२ लाख ७६ हजर २१८ रूपयांचे होते. टर्बाईन मेंटनन्स स्टेज एकचे काम ४ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे होते. सन २०११ मध्ये याच कंपनीला पुन्हा बॉयलर मेटनन्स स्टेज एक व दोनची एकूण १८ कामे मिळाली. या कामांची किंमत ७ कोटी १७ लाख ५७ हजार ५१५ रूपये होती. या प्रकारे अ‍ॅश पाईपलाईन मेन्टनन्स आणि सीएचपी-बीएन्युअल मेंटनन्सच्या कामांचे ११ लाख ८७ हजार ७०५ व ५६ लाख ६२ हजार १७१ रुपये किंमतीचे एक काम मिळाले. सन २०१२ मध्ये याच कंपनीला बॉयलर मेंटनन्स स्टेज एक व दोनचे १२ काम मिळाले. या कामांची एकूण किंमत तीन कोटी ५६ लाख ८७ हजार ३२९ रूपये होती.
कॉलनी क्वॉर्टर वॉटर प्रुफींगचे एक कोटी ६३ लाख ३२ हजार ५७२रूपये किंमतीचे एक आणि सीएचपी-बी चे ८१ लाख १० हजार ७१६ रूपयांचे एक आणि अ‍ॅश पाईप लाईन मेंटनन्सची दोन कामे मिळाली. २०१३-१४ मध्ये या कंपनीला बॉयलर मेंटनन्सचे ९ कोटी ४२ लाख ३०८ रूपयांचे ३२ कामे दिली. याच प्रकारे टर्बाइन, अ‍ॅश पाईपलाईन, सीएचपी मेंटनन्स, कॉलनी वॉटर प्रुफींग व सीएचपी मेंटनन्सची ४ कोटी ३३ लाख ५४ हजार ८१५ रूपये किमतीची १० कामेही दिली. हा प्रकार संशयास्पद असल्याने याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

एसीबीकडून तपासाची मागणी
निविदा प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराची सत्तया जनतेपुढे येणे आवश्य आहे. त्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी प्रहार संगठनेने केली आहे.

कंपनीला काळ्या
यादीत टाका
पप्पू देशमुख म्हणाले, सुनील हायटेक या कंपनीला परळी येथे नव्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम दिले होते. मात्र त्याच्या पूर्णत्वासाठी बराच अवधी लागला आहे. परिणामत: समस्या वाढल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून कंपनीला कायाया यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Boiler Maintenance Tender Scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.