कोरपना तालुक्यात बोगस डॉक्टर
By Admin | Updated: October 13, 2014 23:32 IST2014-10-13T23:32:49+5:302014-10-13T23:32:49+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते.

कोरपना तालुक्यात बोगस डॉक्टर
चंद्रपूर: ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मिळून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे, यासाठी शासनाकडून लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र दिले जाते. मात्र कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
काही गावांमध्ये शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी खासगी रुग्णालये उभारले आहे. ज्या वेळेत शासकीय रुग्णालयात डॉक्टर राहतात. तिचवेळ आपल्या खासगी रुग्णालयातील बोर्डवर लिहिली असल्याने या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयासाठी की, खासगी असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आहे. काही दिवसापूर्वी कोरपना येथे सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डाक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांना केला. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली होती. डॉक्टर शासकीय रुग्णालयातील रुग्णांकडे दुर्लक्ष करीत असून स्वत:च्या रुग्णालयाकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेकवेळा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आमिष दाखवून खासगी रुग्णालयात दाखल करीत असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचा आरोप होत आहे. (नगर प्रतिनिधी)