राजुऱ्यात आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:13+5:302021-07-05T04:18:13+5:30

राजुरा : लोकमत वृत्तपत्र समूह, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली लोकमत सखी मंच, राजुरा ...

Blood donation of Lokmat today in Rajura | राजुऱ्यात आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

राजुऱ्यात आज लोकमतचा रक्तदान महायज्ञ

राजुरा : लोकमत वृत्तपत्र समूह, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली लोकमत सखी मंच, राजुरा नगर परिषद, शिवाजी महाविद्यालय राजुरा, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा, यादवराव धोटे महाविद्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघटना, महिला पतंजली योग समिती, जेसीआई राजुरा, रॉयल इनर्विल क्लब, ब्लॅक पँथर फ्रेंड्स ग्रुप, सेवा कलश फाऊंडेशन, राजुरा, बेफाडो संस्था राजुरा, वाळू संस्था राजुरा, हेल्पिंग हँडस राजुरा यांच्या सहकार्याने लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्रसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा ग्रामीण रुग्णालयात ५ जुलै २०२१ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अविनाश जाधव, ॲड. अरुण धोटे, प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, रंजन लांडे, नगर परिषद उपाध्यक्ष सुनील देशपांडे, ग्रामीण रुग्णालय राजुराचे अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे राहतील. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लॅपटॉप बॅग, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

बहुसंख्य नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन आयोजक व राजुराचे आ. सुभाष धोटे यांनी केले आहे.

040721\img_20210704_172230.jpg

फोटो

Web Title: Blood donation of Lokmat today in Rajura