व्याहाड आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर
By Admin | Updated: December 19, 2015 00:48 IST2015-12-19T00:48:46+5:302015-12-19T00:48:46+5:30
सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज.) येथे स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व्याहाड (बुज.) च्या वतीने ...

व्याहाड आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर
उपरी : सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड (बुज.) येथे स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था व्याहाड (बुज.) च्या वतीने संस्थाध्यक्ष सुनिल बोमनवार यांनी रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच शिला बाबुरावपाटील म्हशाखेत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी कृ.उ.बा. समितीचे माजी संचालक नरेंद्र तांगडे, उपसरपंच योगेश बोमनवार, तुळशिदास बुरडे, डॉ. मारोती मोटघरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, हिवरू गदेवार, अनिल मशाखेत्री, अनिल देवतळे, हृषीकेश नगारे, रघुनाथ मशाखेत्री, मारोती गुरनुले, देवदत बांबोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांनी स्व. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील बोमनवार यांनी मागील चार वर्षापासून प्रा.आ. केंद्र व्याहाड (बुज) येथे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारातून रक्तदान शिबिर व रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. अशा शिबिरामुळे रक्तपेढीत रक्ताचा साठा होण्यास मोठे सहकार्य होत आहे. नागरिकांनी अशा शिबिरात आपले योगदान देण्यासाठी पुढे यावे असे मत व्यक्त केले.
सदर शिबिरामध्ये जवळपास २० रक्तदात्यानी रक्तदान केले. हे रक्त जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढीत जमा करण्यात आले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील चमूने कार्य केले.
त्याचप्रमाणे रुग्णांना पाहुण्यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हृषीकेश नगारे यांनी केले. प्रास्ताविक सुनील बोमनवार यांनी तर आभार संदीप देवघडे यांनी मानले. (वार्ताहर)