ऊर्जानगरात श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:21+5:302021-01-13T05:12:21+5:30
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्ताने ऊर्जानगर श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे सामुदायिक प्रार्थना मंदिराच्या ...

ऊर्जानगरात श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्ताने ऊर्जानगर श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे सामुदायिक प्रार्थना मंदिराच्या परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उदघाटन महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता मदनराव अहिरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. याप्रसंगी एचव्हीडीसीचे कार्यकारी अभियंता अविनाश वठ्ठी, मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक धम्माने, सेवाधिकारी शंकर दरेकर, शाखाध्यक्ष मुरलीधर गोहणे, महिला प्रमुख सुषमा उगे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ग्रामगीतेतील ग्राम आरोग्य या अध्यायाचे सामुदायिक पध्दतीने वाचन करण्यात आले. संगीतकार राजेंद्र पोइनकर रचित स्वागतगीत मुग्धा दुर्गे, भाविका वठ्ठी, अवंती उगे, पार्थ कन्नमवार, विघ्नेश पोईनकर, प्रशांत दुर्गे यांनी सादर केले. प्रास्तविक मुरलीधर गोहणे यांनी केले.
शिबिराचे नियोजन मंडळाचे कोष्याध्यक्ष देवराव कोंडेकर, उपाध्यक्ष नानाजी बावणे, सहसचिव अशोक बिहाडे, रामदास तुमसरे, खेमदेव कन्नमवार, संदीप बोदडे, मनोज चामाटे, मारोती पिदूरकर, अशोक मने, राजेंद्र लांडे, शेखर गाडगे आदी सदस्यांनी सहकार्य केले. संचालन राजेंद्र पोईनकर, आभार विलास उगे यांनी मानले.