शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST2021-02-27T04:37:12+5:302021-02-27T04:37:12+5:30

शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर भद्रावती : शिक्षण संस्था भद्रावतीच्यावतीने संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय नीळकंठराव शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान ...

Blood donation camp at Shinde College | शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

शिंदे महाविद्यालयात रक्तदान शिबिर

भद्रावती : शिक्षण संस्था भद्रावतीच्यावतीने संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय नीळकंठराव शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजना याद्वारे इंडोर स्टेडियम येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी चंद्रपूर येथील राज्य रक्त संक्रमण परिषदचे पवार, गावित, अपर्णा रामटेके व त्यांच्या टीमचे सदस्य उपस्थित होते.

नीळकंठराव शिंदे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल रक्तदान देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी एकूण ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात संस्थेचे सहसचिव डॉ. विवेक शिंदे, संस्थेचे सदस्य डॉ. कार्तिक शिंदे, डॉ.विशाल शिंदे यांनी रक्तदान केले. नीलकंठराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लाडके. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. गजेंद्र बेंद्रे, डॉ. नत्थु वाढवे व संस्थेतील प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Shinde College