राकाँतर्फे राजुरा येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:57+5:302021-04-18T04:26:57+5:30
महाराष्ट्रात रक्ताच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सूचनेनुसार, राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ...

राकाँतर्फे राजुरा येथे रक्तदान शिबिर
महाराष्ट्रात रक्ताच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सूचनेनुसार, राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजुराच्या नवनियुक्त पीएसआय वर्षा तांदूळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात सध्या कोरोना महामारी सुरू असताना रक्ताचा पुरवठा अपुरा पडत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आज असंख्य मित्रमंडळींनी रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, राजुरा शहर अध्यक्ष शभिब शेख, महिला शहर अध्यक्ष अर्चना ददगाड, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, युवक तालुका उपाध्यक्ष सुजीत कावळे, अंकुश भोंगळे, प्रसाद देशमुख, संदीप पोगला, जगदीश साटोने, राजू ददगाड, राहुल वनकर, तथा भास्कर करमनकर उपस्थित होते.