श्याम खोब्रागडे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST2021-08-14T04:33:24+5:302021-08-14T04:33:24+5:30

चंद्रपूर : प्रखर आंबेडकरवादी, यशस्वी उद्योजक स्मृतिशेष श्याम देवाजी खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ ...

Blood donation camp on the occasion of Shyam Khobragade's birthday | श्याम खोब्रागडे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

श्याम खोब्रागडे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

चंद्रपूर : प्रखर आंबेडकरवादी, यशस्वी उद्योजक स्मृतिशेष श्याम देवाजी खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन चंद्रपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

शिबिराचे उदघाटन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता रामटेके उपस्थित होत्या. यावेळी डॉ. विवेक बांबोळे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांनी समाजात नेहमी सर्व घटकांना मदत करण्याचे आव्हान केले. तसेच जनतेच्या उपयोगाचे सामाजिक उपक्रम गावागावात राबविण्याचे आवाहन केले. संचालन जिल्हाअध्यक्ष प्रेमदास बोरकर तर आभार लीना खोब्रागडे यांनी मानले. यावेळी प्रतीक डोर्लीकर, प्रारब्ध निमगडे, अभिजित तोतडे, ज्योती शिवणकर, शरयू रामटेके, स्नेहा भैसरे, जीवन कोवले, विनोद वाघमारे, लोकेश खोब्रागडे, तथागत साठे, अमित ठाकरे, नावतोष मिष्टी यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी विशालचंद्र अलोणे, राजस खोब्रागडे, हरिदास देवगडे, सुरेश शंभरकर, मृणाल कांबळे, अश्विनी खोब्रागडे, हर्षल खोब्रागडे, माणिक जुमडे, यशवंत मुंजमकर आदींनी परिश्रम केले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Shyam Khobragade's birthday