सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:11+5:302021-01-08T05:34:11+5:30
बल्लारपूर : येथील ओबीसी समन्वय समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संत शिरोमणी जगनाडे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
बल्लारपूर : येथील ओबीसी समन्वय समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संत शिरोमणी जगनाडे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. तसेच शासकीय रुग्णालयातील ब्लडबँकेच्या टीमचे सदस्य वर्षा सोनटक्के, कृतिका गर्गीलवार, रूपक कामळी, दिनेश बागड यांचे स्वागत अनिल वागदरकर, विवेक खुंटेमाटे, इंदुताई राजूरकर, अर्चना फरकाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सतीश बावणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, फुले दाम्पत्य यांनी समाजासाठी आपल्या जीवाचे रान केले. प्रथम सावित्रीबाई यांना ज्योतिरावांनी शिक्षित केले आणि सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षण घडून आणले. संचालन किशोर मोहुर्ले यांनी केले, तर अमोल काकडे यांनी आभार मानले. यावेळी जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात अंकित निवलकर, सुनील भटारकर, अमित मांडवकर, संतोष गौरकर, संदीप खांडेकर, कुणाल कौरसे, चंदू वाढई, अशोक झोडे, प्रभाकर कवलकर, महाकाळकर, मनोहर माडेकर यांचा समावेश आहे.