शासकीय आयटीआयमध्ये रक्तदान शिबिर

By Admin | Updated: May 18, 2014 23:29 IST2014-05-18T23:29:03+5:302014-05-18T23:29:03+5:30

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने कौशल्यम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Blood Donation Camp in Government ITI | शासकीय आयटीआयमध्ये रक्तदान शिबिर

शासकीय आयटीआयमध्ये रक्तदान शिबिर

 चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने कौशल्यम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, डॉ. अंकुश चितडे, गटनिदेशक पी.पी. कटरे, यशवंत गायकवाड, एन.एम. वैद्य आदींची उपस्थिती होती. डॉ. अनंत हजारे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाद्वारे आयोजीत या शिबिरात एकूण ४० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यात तीन निदेशकांचाही समावेश होता. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामान्य रुग्णालयाचे जयेश पचारे, हेमाली इंदूरकर, योगेश जारोंडे, लक्ष्मण नगराळे, रूपेश घुमे तसेच संस्थेतील विकास जयपूरकर, शंकर मद्येलवार, श्रीकांत प्रतापवार, ए.डी. बांते, एच.बी. पटले, बी.आर. बोढेकर, जे.एन. मेचीनेणी, ए.एन. काळे, सर्व निदेशक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Blood Donation Camp in Government ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.