वंचित आघाडीतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:07+5:302021-04-19T04:25:07+5:30
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून ...

वंचित आघाडीतर्फे रक्तदान शिबिर
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त १३० युनिट रक्तसंकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात १२ जणांनी रक्तदान केले. प्रास्ताविक सुभाष थोरात यांनी केले. यशस्वीतेसाठी शहर उपाध्यक्ष सुभाष थोरात, जिल्हा सदस्य मिलिंद दुर्गे, कृष्णाक पेरकावर, सोनल वाळके, अशोक पेरकावार, अक्षय लोहकरे, विशेष निमगडे, विष्णू चापले, कुणाल उराडे, बादल पिंपळे, हर्षवर्धन कोठारकर, विवेक दुपारे, प्रणित तोडे, राहुल शेंडे, आकाश गेडेकर आदींनी परिश्रम घेतले.
-------
सांची बुद्ध विहार बल्लारपूर येथे विविध कार्यक्रम
फोटो
बल्लारपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सांची बुद्ध विहार बल्लारपूर येथे विविध कार्यक्रम पार पडले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यानंतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीक्षा धोंगडे, स्नेहल खेकारे, स्वाती धोंगडे, संगिता वेले, स्नेहा वेले, प्रियंका तेलंग, ज्योती मेश्राम, प्रमिला गोंडाने, रजनीश खेकारे, कशिष वेले, शुभम चिकाटे ,रक्षित चिकाटे यांच्यासह सांची महिला मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. संचालन वनिता वेले तर आभार अर्चना खरतड यांनी मानले.