राजीव गांधी जयंती दिनी ७१ जणांचे रक्तदान

By Admin | Updated: August 23, 2015 01:21 IST2015-08-23T01:21:10+5:302015-08-23T01:21:10+5:30

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंती दिनी आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले.

Blood donation of 71 people on Rajiv Gandhi Jayanti day | राजीव गांधी जयंती दिनी ७१ जणांचे रक्तदान

राजीव गांधी जयंती दिनी ७१ जणांचे रक्तदान

बल्लारपूर : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंती दिनी आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. बल्लारपूर तालुका तथा शहर एन.एस.यु.आय. द्वारा आयोजित हे रक्तदान शिबिरर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा छाया मडावी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, नगरपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते देवेंद्र आर्य, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुभाष कुंभारे, अ‍ॅड. मेघा भाले, दिलीप माकोडे, टी. पद्माराव, जयकरण बजगोती, बल्लारपूर तालुका एनएसयुआयचे अध्यक्ष चेतन गेडाम व बल्लारपूर शहर एनएसयुआयचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मुलचंदानी, माकोडे, डॉ. कुंभारे यांची भाषणे झालीत. संचालन व आभार प्रदर्शन आर्य यांनी केले. तत्पूर्वी राहुल गांधी युथ क्लबच्यावतीने बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी तसेच नगरपरिषद भवनात स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. क्लबचे गोपाल कलवला, सोनू आमटे, अक्षय कारेकर, विशू नतकाटे, गुरुकामटे, दीपक भोगले, सुदर्शन भिमनवार, महेश सदाता, विल्सन बोजा आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Blood donation of 71 people on Rajiv Gandhi Jayanti day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.