बल्लारपुरात भाजपचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST2021-06-27T04:19:17+5:302021-06-27T04:19:17+5:30

बल्लारपूर : ओबीसी समाजावर राज्य सरकार अन्याय करीत असून. या अन्यायाविरुद्ध भाजपने राज्यव्यापी चक्का जाम पुकारला. येथील बामणी टी ...

Block BJP's way in Ballarpur | बल्लारपुरात भाजपचे रास्ता रोको

बल्लारपुरात भाजपचे रास्ता रोको

बल्लारपूर : ओबीसी समाजावर राज्य सरकार अन्याय करीत असून. या अन्यायाविरुद्ध भाजपने राज्यव्यापी चक्का जाम पुकारला. येथील बामणी टी पाॅइंटला रास्ता रोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती. आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.

याप्रसंगी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बल्लारपूर भाजप अध्यक्ष काशीनाथ सिंह, महिला आघाडीच्या अध्यक्षा अलका आत्राम व नीलेश खरबडे यांची भाषणे झाली. यावेळी रेणुका दुधे, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास सुंचूवार, सविंदरसिंग दारी, सुवर्णा भटारकर, पूनम मोडक, वैशाली जोशी, कांता ढोके, आरती अक्केवार, स्वामी रायबरम, महेंद्र धोके, चंदू मार्गोवार, आशिष देवतळे उपस्थित होते.

Web Title: Block BJP's way in Ballarpur