अंध व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे
By Admin | Updated: March 19, 2017 00:39 IST2017-03-19T00:39:52+5:302017-03-19T00:39:52+5:30
अंध व्यक्ती हासुद्धा समाजाचाच अविभाज्य घटक आहे. अंधाना समाजाने मनातून स्विकारले तर त्यांच्यात उर्जा येते.

अंध व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे
चंद्रपूर : अंध व्यक्ती हासुद्धा समाजाचाच अविभाज्य घटक आहे. अंधाना समाजाने मनातून स्विकारले तर त्यांच्यात उर्जा येते. ते स्वावलंबी बनतात. अंधांनी शैक्षणिक व स्पर्धात्मक परीक्षेतही सहभागी व्हावे, असे मनोगत राधा बोरडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक आय.एम.ए. सभागृहात अंध व डोळस कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दृष्टीहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था व इनरव्हिल क्लब आॅफ स्मार्ट सिटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शकुंतला गोमल होत्या. मंचावर डॉ. विद्या बांगडे, प्रतिभा मिश्रा, शाहीन शफीक, पूजा ठाकरे, अॅड. वैशाली टोंगे, डॉ. भारती दुधानी, डॉ. शर्मीली पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होत्या. लुई बेल आणि हेलन क्रेलर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी नागपूर महाराष्ट्र बँकेत कार्यरत असलेल्या अंध कर्मचारी अंजली देशमुख, चाळीसगाव अंध शाळेतील मुख्याध्यापिका प्रभा मेश्राम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधा बोरडे व डोळस महिला कृती सोनटक्के यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अॅड. वैशाली टोंगे यांनी अंध महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. डॉ. भारती दुधानी यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)