श्रींच्या आशीर्वादाने फुलली मर्मबंधातील ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST2021-09-24T04:32:28+5:302021-09-24T04:32:28+5:30

चंद्रपूर : कोरोना नियमांचे पालन करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर पारखी यांच्या तुकूम येथील घरी श्रींच्या चरणी ...

With the blessings of Shri | श्रींच्या आशीर्वादाने फुलली मर्मबंधातील ठेव

श्रींच्या आशीर्वादाने फुलली मर्मबंधातील ठेव

चंद्रपूर : कोरोना नियमांचे पालन करून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर पारखी यांच्या तुकूम येथील घरी श्रींच्या चरणी विमाशिचे कार्यवाह तथा नाट्यकलावंत श्रीहरी शेंडे यांची 'मर्मबंधातील ठेव' या भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीताची गायन मैफील रंगली.

श्रीहरी शेंडे यांच्या प्रथम तुला वंदितो या प्रार्थनेने गायन कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकापेक्षा एक अशी सुरेश भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीतांनी कार्यक्रमाची रौनक वाढविली. प्रा. श्याम धाेपटे यांनी संत नामदेव महाराजांचा अभंग सादर करून उपस्थितांना भक्तिमय केले. या वेळी विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्राचार्य शाम धोपटे, दिनकर धोबे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनमुलवार, प्राचार्य आस्तिक उरकुडे, भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष नागापुरे आदींची उपस्थिती होती. सतीश कौरासे यांचा तबला आणि किशन पोडे यांची हार्मोनियमची साथ यामुळे शेंडे यांच्या गायनाला एक वेगळ्या उंचीवर गेले. या वेळी परिसरातील नागरिकांनीही कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Web Title: With the blessings of Shri