आनंदप्राप्तीसाठी ईशचिंतन आवश्यक

By Admin | Updated: November 22, 2015 00:44 IST2015-11-22T00:44:40+5:302015-11-22T00:44:40+5:30

जगात सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टी असून कुणी सुखाचे जीवन जगत आहे. तर कुणी दु:खी आहे. जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल तर मन शांत ठेवा, ...

Blessings are necessary for happiness | आनंदप्राप्तीसाठी ईशचिंतन आवश्यक

आनंदप्राप्तीसाठी ईशचिंतन आवश्यक

विचक्षण व्याख्यानमाला : पंकज चोपडा यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : जगात सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टी असून कुणी सुखाचे जीवन जगत आहे. तर कुणी दु:खी आहे. जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल तर मन शांत ठेवा, ईश्वराची आराधना करा, चिंतन करा, तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल, असे प्रतिपादन खाचरौद येथील पंकज चोपडा यांनी केले.
चंद्रपूर येथील जैन श्वेतांबर मंदिराच्या शताधिक महोत्सवानिमित्त आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत चौथ्या दिवशी ‘श्रेष्ठ जीवन कसे जगावे व परमआनंद कसे मिळवावे’ या विषयावर ते बोलत होते.
पंकज चोपडा पुढे म्हणाले, आत्मीक आनंद हेच खरे सुख आहे, असे सांगत आनंद प्राप्तीसाठी त्यांनी काही उपाय सांगितले. कुणाला दु:ख देऊ नका, अपमानित करू नका, मन दुखवू नका, दुसऱ्यासाठी जगा आणि नेहमी आनंद ही वस्तू नसून अनुभूती आहे, हे लक्षात ठेवण्यास सांगितले.
तत्पूर्वी हेमप्रज्ञाश्रीजी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी दुसऱ्यांप्रति मनात चिंता असणे हे मैत्रीभाव आहे. ज्यामुळे आत्मदृष्टी परिवपक्व होते. मैत्रीभाव दृढ होते, असे सांगितले. प्रिया कोचर यांनी विचक्षणश्रीजी यांच्या जीवनावर गीत प्रस्तुत केले. त्यानंतर सायंकाळी सखी कोचर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्यांनी आपल्या सुमधूर गितांने उपस्थितांची मन जिंकली. (स्थानिक प्रतिनिधी)
आज विद्यार्थ्यांची कार्यशाळा
या महोत्सवानिमित्त ९ वी ते त्यापेक्षा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. दुपारी १ ते २.३० या वेळात ही कार्यशाळा जैन भवन येथे होत आहे.

Web Title: Blessings are necessary for happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.