भद्रावती महिला काँग्रेसतर्फे ब्लॅकेट वाटप

By Admin | Updated: November 24, 2015 01:19 IST2015-11-24T01:19:13+5:302015-11-24T01:19:13+5:30

वरोरा -भद्रावती महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वरोरा-गरजू महिलांना

Blake allotment by Bhadravati Mahila Congress | भद्रावती महिला काँग्रेसतर्फे ब्लॅकेट वाटप

भद्रावती महिला काँग्रेसतर्फे ब्लॅकेट वाटप

भद्रावती : वरोरा -भद्रावती महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वरोरा-गरजू महिलांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
महिला प्रदेश कमेटीच्या सरचिटणीस नंदा अल्लुरवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर डॉ. आसावरी देवतळे प्रमुख पाहुण्या होत्या. पुष्पा कापकर, लता ताटेवार, चंद्रकला पारोदे, अर्चना आरेकर, मदिना शेख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर पाहुण्यांनी त्यांच्या जीवनचरित्रावर विचार प्रगट केले. समाजाचे प्रश्न राजकारणातून सोडविण्यासाठी महिलांनी इंदीरा गांधींचा वसा घ्यावा, असे आवाहन पाहुण्यांनी केले. संचालन उषा सातपुते यांनी केले. यावेळी तालुक्यातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होत्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Blake allotment by Bhadravati Mahila Congress