लोहार समाजाने आधुनिक विचारांकडे वाटचाल करावी
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:23+5:302016-03-16T08:35:23+5:30
समाज बांधवांच्या जीवनात नव्या वाटा गरजेचे आहेत. प्रगतीसाठी व विकासासाठी शिक्षणही महत्त्वाचे आहे.

लोहार समाजाने आधुनिक विचारांकडे वाटचाल करावी
दहेली येथे प्रबोधन मेळावा : सामाजिक कार्यकर्ता व गुणवंतांचा सत्कार
बल्लारपूर : समाज बांधवांच्या जीवनात नव्या वाटा गरजेचे आहेत. प्रगतीसाठी व विकासासाठी शिक्षणही महत्त्वाचे आहे. परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची झालर देणे क्रमप्राप्त असून यासाठी शिवधनुष्य पेलण्याची मानसिकता बाळगा. लोहार समाज बांधवांनी इतिकर्तव्य समजून आधुनिक विचाराने वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समिती सभापती देवराव भोंगळे यांनी केले.
दहेली येथे समाजप्रबोधन मेळावा रविवारी पार पडला. या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. बल्लारपूर तालुका लोहार व तत्सम जाती बहुुउद्देशीय विकास सामाजिक संघटनेच्या वतीने दहेली येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या प्रांगणात तालुकास्तरीय प्रभू विश्वकर्मा जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक प्रबोधन मेळावा व सामाजिक कार्यकर्ता, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरीश गेडाम, बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर, गाडी लोहार महासंघाचे महासचिव सुरेश मांडवगडे, नाभिक विचारमंच संस्थापक हरिश ससनकर, दहेलीचे सरपंच ज्ञानेश्वर टेकाम, माजी उपसभापती विलास बोबडे, शैलेश बावणे, कविता गेडाम, मारोती साव, आनंदराव बावणे, गजानन चिंचोलकर, संतोष जगझाप, नवनाथ कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृतीचिन्ह ेदेऊन सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)