काळ्या फिती लावून पत्रकारांनी मोर्चात सहभागी व्हावे

By Admin | Updated: August 24, 2015 01:13 IST2015-08-24T01:13:08+5:302015-08-24T01:13:08+5:30

हल्ली पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. आणि आतातर एकात्मक वृत्त बघून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे.

With black rhetoric, journalists should join the rally | काळ्या फिती लावून पत्रकारांनी मोर्चात सहभागी व्हावे

काळ्या फिती लावून पत्रकारांनी मोर्चात सहभागी व्हावे

चंद्रपूर : हल्ली पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. आणि आतातर एकात्मक वृत्त बघून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे. ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होय. असे असताना मात्र शासनाकडून पत्रकारांना कोणतेही संरक्षण दिले जात नाही. हे संरक्षण मिळणे आता काळाची गरज असून या संदर्भातीलही मागणी रेटून धरण्यासाठी मंगळवारी मुक मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पत्रकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत बोलताना पत्रकार संजय रामगिरवार म्हणाले, दारूबंदीनंतर श्रमिक एल्गार संघटनेची जणू भूमिका बदलली आहे. कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याचे आता टाळले जाते. गडकरी यांच्या बातमीवर श्रमिक एल्गारने आपली भूमिका पोलिसात तक्रार देऊन स्पष्ट केली आहे. त्यामुळे पत्रकार संघटनांनीही आपली भूमिका घ्यायला पाहिजे, तर या विषयी बोलतांना चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास म्हणाले, या घटनेचा तिव्र निषेध नोंदविणे काळाची गरज असून हा निषेध संयुक्तरित्या नोंदविल्या गेला पाहिजे, असे ते म्हणाले. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात असेल तर अशा संघटनांच्या बातम्या प्रकाशित करू नका व अशा संघटनांचे पदाधिकारी एखाद्या कार्यक्रमात असतील तर त्याही बातम्या घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
सरतेशेवटी या विषयावर गांभीर्याने विस्तृत चर्चा करण्यात येऊन येत्या मंगळवारी येथील कौस्तुरबा चौकातून (गिरनार) पत्रकारांचा मूक मोर्चा श्रमिक एल्गार संघटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काढण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने काळी फित लावून सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल मांडवकर, मुरलीमनोहर व्यास, किशोर पोतनवार, श्रीधरराव बल्की यांनी केले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता गिरनार चौकातून निघणार असेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सभेला उपस्थित सर्व पत्रकार संघातर्फे निषेध प्रस्ताव पारित करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)
बल्लारपुरात निषेध सभा
सावली येथील पत्रकार उदय गडकरी यांच्यावर सहा पोलीस ठाण्यात श्रमिक एल्गार संघटनेकडून तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेच्या निषेधात रविवारी वसंत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. याप्रकरणी दाद मागण्यासाठी उद्या सोमवारी येथील तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अजय दुबे, पदमाकर पांडे, मंगल जीवने, योगेश खेडेकर, अनकेश्वर मेश्राम, नरेश मुंदडा, समीर केने, श्रीनिवास, विकास राजूरकर आदी उपस्थित होते.

Web Title: With black rhetoric, journalists should join the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.