भाजपाचे कार्य सामाजिक बांधिलकी जोपासणारे
By Admin | Updated: August 30, 2016 00:40 IST2016-08-30T00:40:55+5:302016-08-30T00:40:55+5:30
भाजपा पक्ष जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. सामाजिक न्यायाची भूमिका पार पाडणारा आहे.

भाजपाचे कार्य सामाजिक बांधिलकी जोपासणारे
चंदनसिंह चंदेल : गरजुंना मोफत चष्मे वितरण
बल्लारपूर : भाजपा पक्ष जनतेच्या हितासाठी कार्यरत आहे. सामाजिक न्यायाची भूमिका पार पाडणारा आहे. आम्ही सर्व सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला. यामुळे आमचे सरकार केंद्र व राज्यात सत्तारुढ आहे. आम्ही सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत असून भाजपाचे कार्य सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी येथे शुक्रवारी केले.
येथील भाजपाच्या वतीने मुंबई येथील एम्पथी फाऊंडेशनच्या वैद्यकीय चमूनी नेत्र तपासणी शिबिर घेतले होते. यामध्ये एक हजार २६१ पात्र नेत्र रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप भाजपाच्या स्थानिक कार्यालयात करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन चंदेल बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा, शहर महासचिव मनिष पांडे, न.प. सभापती येल्लया दासरक, माजी नगरसेवक निलेश खरबडे, राजू गुंडेट्टी, प्रदीपसिंह बैस, शैलेंद्र बैस, एम्पथी फाऊंडेशनचे अध्यक्ष शर्मा यांची उपस्थिती होती.
यावेळी हरिश शर्मा म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सामाजिक कार्य प्रेरणा देणारे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात त्यांनी विकासाचा ठसा उमटविला आहे. सर्वांगीण विकासाचे नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या प्रेरणेतून सर्वसामान्य जनतेनी नेत्र तपासणी करुन मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यांचे कार्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. या लोकनेत्यांच्या प्रयत्नामुळे गरिबांना जगाची सुंदरता न्याहाळता यावी म्हणून मोफत चष्मे देण्यात आले. या सामाजिक कार्याचे त्यांनी भरभरुन कौतुक केले. संचालन शहर भाजपाचे महासचिव मनिष पांडे यांनी तर आभार काशिनाथ सिंह यांनी मानले. छगन जुमले, नरेश डोंगरे, राजू दासरवार, राजकुमार श्रीवास्तव, प्रकाश गजपुरे, सुनिल लोहकरे, आशिष देवतळे, सुरज वाकुळकर यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)