सभापतीपदावर भाजपचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:44+5:302021-06-29T04:19:44+5:30
नागभीड नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवडणूक सोमवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. त्यात भाजपाचे उमेदवार अविरोध निवडून आले. ...

सभापतीपदावर भाजपचा वरचष्मा
नागभीड नगर परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवडणूक सोमवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. त्यात भाजपाचे उमेदवार अविरोध निवडून आले. यात बांधकाम समिती सभापतीपदी सचिन आकुलवार यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी अर्चना मोजेस मरकाम तर पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे पदसिद्ध सभापती गणेश तर्वेकर हे असून त्यांनी समितीचे नव्याने गठण केले आहे. यावेळी स्थायी समितीचीही स्थापना करण्यात आली. या विशेष समिती व स्थायी समितीच्या निवडणूक सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंडे यांनी सहकार्य केले.