भाजपचे प्रशांत वाघरे विजयी
By Admin | Updated: January 31, 2015 01:35 IST2015-01-31T01:35:15+5:302015-01-31T01:35:15+5:30
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत पुंडलिक वाघरे एक हजार ५६ मतांनी विजयी झाले आहेत.

भाजपचे प्रशांत वाघरे विजयी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत पुंडलिक वाघरे एक हजार ५६ मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसकडे असलेली ही जागा भाजपने पोटनिवडणुकीत जिंकली.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची पोटनिवडणूक २८ जानेवारी रोजी पार पडली. आज शुक्रवारी सकाळी गडचिरोली तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे गोकुलदास कुमदेव ठाकरे यांना एक हजार ५५६ मते, अपक्ष उमेदवार योगाजी मारोती बनपूरकर यांना तीन हजार २९ तर बहुजन समाज पार्टीचे प्रशिक सदाशिव म्हशाखेत्री यांना ३०१ व तर भाजपचे प्रशांत पुंडलिक वाघरे यांना चार हजार ८५ मते मिळाली. प्रशांत वाघरे यांनी अपक्ष उमेदवार योगाजी बनपूरकर यांचा एक हजार ५८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत नऊ हजार १८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यापैकी २१३ मतदारांनी नोटाचाही वापर मतदानात केला. (जिल्हा प्रतिनिधी)