गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे चंद्रपुरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:40+5:302021-03-22T04:25:40+5:30

भीक मागून केला निषेध : भाजपा-महिला मोर्चा व भाजयुमोची जोरदार घोषणाबाजी चंद्रपूर : येथील भारतीय जनता पार्टीने माजी वित्तमंत्री ...

BJP's agitation in Chandrapur for resignation of Home Minister | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे चंद्रपुरात आंदोलन

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे चंद्रपुरात आंदोलन

भीक मागून केला निषेध : भाजपा-महिला मोर्चा व भाजयुमोची जोरदार घोषणाबाजी

चंद्रपूर : येथील भारतीय जनता पार्टीने माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जटपुरा गेट परिसरात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भीक मांगो आंदोलन करून निषेध नोंदविला.

भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रा.) देवराव भोंगळे व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या, राज्य शासनाचा निषेध व भीक मांगो आंदोलनात भाजपा, महिला मोर्चा व भाजयुमोच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी कटोरा घेऊन भीक मागून निषेध नोंदविला.

यावेळी महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष(ग्रा)अलका आत्राम, महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री शीला चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष (ग्रा) आशिष देवतळे, जिल्हाध्यक्ष महानगर विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव डुकरे, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, गजानन गोरंटीवार, उषा मेश्राम, ऋषी कोटरंगे, मंजुश्री कासंगोट्टूवार, रवी लोणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी देवराव भोंगळे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

यावेळी महिला मोर्चाच्या नेत्या अंजली घोटेकर, प्रभा गुढधे, सपना नामपल्लीवार, रविदास, रेणू घोडेस्वार, मोनिषा महातव, पूनम गरडवा, माया उईके, शीतल आत्राम, सुषमा नागोसे, किरण बुटले, बात्ते, भडके यांनी सांकेतिक भीक मांगो आंदोलन करीत शासनाचा निषेध नोंदविला.

Web Title: BJP's agitation in Chandrapur for resignation of Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.