तृणमूल कॉंग्रेसविरोधात भाजपाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:17+5:302021-05-06T04:30:17+5:30
चंद्रपूर : पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात जटपुरा गेट म. गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. माजी ...

तृणमूल कॉंग्रेसविरोधात भाजपाचे आंदोलन
चंद्रपूर : पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात जटपुरा गेट म. गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल येथे तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अत्याचार होत आहे. या अत्याचाराविरोधात उच्चस्तरीय चोकशी करुन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे, जि. प. सदस्य रणजित सोयाम, आशीष वाढई आदी उपस्थित होते.