मारोड्यात भाजपाला धक्का, काँग्रेसची सत्ता

By Admin | Updated: September 13, 2015 00:52 IST2015-09-13T00:52:10+5:302015-09-13T00:52:10+5:30

मागील पाच वर्षांपासून मारोडा येथील ग्रामपंचायतीवर असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणून काँग्रेसने आपल्या पक्षाचा झेंडा फडकविला आहे.

The BJP is pushing the Congress, the Congress' power | मारोड्यात भाजपाला धक्का, काँग्रेसची सत्ता

मारोड्यात भाजपाला धक्का, काँग्रेसची सत्ता

११ सदस्यसंख्या : ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच निवडणूक
चंद्रपूर : मागील पाच वर्षांपासून मारोडा येथील ग्रामपंचायतीवर असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणून काँग्रेसने आपल्या पक्षाचा झेंडा फडकविला आहे. पुल्लावार गटाच्या नेतृत्वात लढविलेल्या या निवडणुकीत सरपंचपदी स्वाती फुंकटवार तर उपसरपंचपदी सुलभा नन्नावरे निवडून आल्या आहेत.
११ सप्टेंबरला झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वाती फुंकटवार तर भाजपाकडून स्वाती टेकुलवार यांच्यात लढत झाली. फुंकटवार यांना ९ तर टेकुलवार यांना दोन मते मिळाली. दोन सदस्य तटस्थ राहिले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सुलभा नन्नावरे होत्या. त्यांना ९ तर भाजपाच्या उमेदवार निराशा निमगडे यांना दोन मते मिळली. या निवडणुकतही दोन सदस्य तठस्थ राहीले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी कोमावार तर सहाय्यक अधिकारी ग्रामसचिव मधुकर गुरनुले होते.
यापूर्वी तब्बल १५ वर्षे ही ग्रामपंचायत काँगे्रसकडे होती. मागील पाच वर्षांच्या काळात भाजपाची सत्ता होती. आता पुन्हा काँग्रेसने ताबा मिळविला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली पुल्लावार, अशोक पुल्लावार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The BJP is pushing the Congress, the Congress' power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.