सलग दुसऱ्यांदा नारंडा येथे भाजपची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:36+5:302021-02-15T04:24:36+5:30
यामध्ये सरपंचपदी अनुताई वसंतराव ताजने व उपसरपंचपदी बाळा विठ्ठल पावडे यांची निवड झाली आहे. नारंडा ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य ...

सलग दुसऱ्यांदा नारंडा येथे भाजपची सत्ता
यामध्ये सरपंचपदी अनुताई वसंतराव ताजने व उपसरपंचपदी बाळा विठ्ठल पावडे यांची निवड झाली आहे.
नारंडा ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य आहेत. यामध्ये भाजपला नऊ पैकी सात जागा जिंकण्यात यश प्राप्त झाले व शेतकरी संघटना एक, काॅंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधी असणारे दोन्ही पक्षांनी एकत्रित होऊन युती करून निवडणूक लढवली, परंतु जनतेने युतीला नाकारत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने स्पष्ट जनादेश देत कौल दिला.
भारतीय जनता पार्टीतर्फे अनुताई ताजने, बाळा पावडे,अनिल शेंडे, रूपाली उरकुडे, रंजना शेंडे, शालू हेपट, बापूराव सिडाम हे सात उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे.