भाजपातर्फे लालपेठ परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:57+5:302021-07-17T04:22:57+5:30

चंद्रपूर : शहरातील लालपेठ परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उत्तर भारतीय मोर्चा चंद्रपूर महानगर अध्यक्ष ...

BJP planting trees in Lalpeth area | भाजपातर्फे लालपेठ परिसरात वृक्षारोपण

भाजपातर्फे लालपेठ परिसरात वृक्षारोपण

चंद्रपूर : शहरातील लालपेठ परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उत्तर भारतीय मोर्चा चंद्रपूर महानगर अध्यक्ष रुद्रनारायण तिवारी, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. गुलवाडे म्हणाले, विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली आहे. त्या चळवळीत प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सामील झाला व या चळवळीला नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य वृक्षारोपणाच्या माध्यमातून केले असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे माजी अध्यक्ष तुषार सोम, उपाध्यक्ष रामपाल सिंग, सचिव रामकुमार आक्कपेल्लीवार, शिवमंगल यादव, राम कुमार मौर्या, कन्हैया यादव, उग्रसेन पांडे, विनोद शर्मा, राकेश दवे, मोहन यादव, नंदजी वर्मा, रामजीत राजभर, बृजभूषण चौधरी, रवी, सागर भगत, अशोक यादव, प्रलय सरकार, कृपाशंकर उपाध्याय, दिलीप पांडेय, कृष्णा कुंडु आदी उपस्थित होते.

Web Title: BJP planting trees in Lalpeth area