शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा उघडकीस आणण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:37 IST

देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसची टीका : ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन चंद्रपूर : देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ५० दिवसांमध्ये देशातील काळा पैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही सरकार आतापर्यंत काळा पैसा उघडकीस आणू शकलेले नाही. सरकारचा नोटबंदीच घेतलेला निर्णय चुकीचा सिद्ध झाला, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सोमवारी येथे केला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रकाश राठोड आणि विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश राठोड म्हणाले की, नोटबंदीमध्ये भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्याच वेळी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या ५० दिवसांमध्ये सामान्य लोकांचे बँकांमध्ये १४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. नोटबंदीनंतरही काळा पैसा बाहेर येऊ शकलेला नाही. जनविरोधी निर्णय घेऊन मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशासह चंद्रपूर जिल्ह्यात ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले जाणार आहे.े महागाईविरोधात ९ जानेवारी रोजी चंद्रपूर येथे महिलांचे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात नोटबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाली. ती लक्षात घेऊन मोदी सरकार कॅशलेस व्यवहार करण्याचा राग गात आहे. परंतु भाजप सरकारची ही योजनादेखील अपशयी ठरत आहेत. राज्यातील ४१ हजार गावांमध्ये बँक नाहीत आणि शेतकऱ्यांची बँकेत जमा ठेवही नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच नसल्याने ते कॅशलेस व्यवहार कसे करू शकतात? शहरी भागातील अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. मोदी सरकारच्या ५० दिवसांच्या निर्णयानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस महानगराध्यक्ष नंदू नागरकर व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणनकर यांच्यासह कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)