विचोडा, चांदसुर्ला ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:14+5:302021-02-20T05:23:14+5:30
चंद्रपूर : तालुक्यातील गट ग्रामपंचायत विचोडा, चांदसुर्लावर सतत तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला झेंडा रोवण्यात यश आले आहे. गट ...

विचोडा, चांदसुर्ला ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
चंद्रपूर : तालुक्यातील गट ग्रामपंचायत विचोडा, चांदसुर्लावर सतत तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला झेंडा रोवण्यात यश आले आहे. गट ग्रामपंचायत विचोडा, चांदसुर्लाच्या सरपंच माधुरी बंडू सागोरे, उपसरपंचपदी अनिल डोंगरे यांची निवड झाली आहे.
चंद्रपूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. तालुक्यातील गटग्रामपंचायत विचोडा, चांदसुर्ला येथे पुन्हा एकदा भाजपने बाजी मारत मागील १५ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. सरपंचपदी माधुरी सागोरे तर उपसरपंचपदी अनिल डोंगरे विजयी झाले. ही निवडणूक माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजप ज्येष्ठ नेते रामपाल सिह, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष नामदेव आसुटकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. विजयी झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव केतन शिंदे, शांताराम चौके, विजय झाडे, रघुनाथ नागरकर, प्रमोद जाधव, अर्जुन नगरकर, रवींद्र हेलवडे, वसंत महल्ले आदी उपस्थित होते.