चंद्रपूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

By Admin | Updated: March 14, 2017 19:34 IST2017-03-14T19:34:09+5:302017-03-14T19:34:09+5:30

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली

BJP flag on 11 Panchayat Samitis in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

चंद्रपूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

>ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर,दि.14 - जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे . हे यश जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वासाचे द्योतक असून चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलवू अशी ग्वाही वित्तमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे . नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे अभिनंदन करत ना मुनगंटीवार यांनी विकास प्रक्रियेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे .

Web Title: BJP flag on 11 Panchayat Samitis in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.