७१७ रक्तदात्यांचा भाजपतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST2021-01-20T04:28:26+5:302021-01-20T04:28:26+5:30
२१ नाेव्हेंबर रोजी येथील गांधी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तब्बल ७१७ दात्यांनी रक्तदान केले. यात १३ ...

७१७ रक्तदात्यांचा भाजपतर्फे सत्कार
२१ नाेव्हेंबर रोजी येथील गांधी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तब्बल ७१७ दात्यांनी रक्तदान केले. यात १३ महिलांचा समावेश होता. त्यांचे मनोबल वाढून रक्तदानाला प्रोत्साहन मिळावे म्हणून, रक्तदात्यांचा शाल व श्रीफळ, हेल्मेट आणि पाण्याची कॅन देऊन भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जि.प. महिला व बाल कल्याण सभापती नितू चौधरी, नकोडा-मार्डा जि.प. क्षेत्राचे सदस्य ब्रिजभूषण पाझरे, भाजप तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, संजय तिवारी, सिनू इसरप, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, नंदा कांबळे, सुचिता लुटे, भाजप नेते विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, रत्नेश सिंग, संजय भोंगळे, अनिल मंत्रिवार, सुनील राम, सुरेश खडसे, इम्तियाज रज्जाक मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे यांनी केले. आभार दशरथ असपवार यांनी मानले.
कार्यक्रमात प्रयास सखी मंच मुख्य मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, भाजपा नेते बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, निरंजन डंभारे, श्रीकांत सावे उपस्थित होते
.