मूल नगर परिषद सभापतिपदांवर भाजपचेच वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:06+5:302021-01-08T05:34:06+5:30
यात बांधकाम समिती सभापतिपदी प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी अनिल साखरकर, शिक्षण व क्रीडा समिती सभापतिपदी मिलिंद खोब्रागडे, महिला ...

मूल नगर परिषद सभापतिपदांवर भाजपचेच वर्चस्व
यात बांधकाम समिती सभापतिपदी प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी अनिल साखरकर, शिक्षण व क्रीडा समिती सभापतिपदी मिलिंद खोब्रागडे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी शांता मांदाळे तसेच स्वच्छता व आरोग्य समिती सभापतिपदी नंदू रणदिवे यांची निवड झाली आहे.
१७ सदस्यीय मूल नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मूल नगर परिषदेवर भाजपाने निर्विवाद सत्ता मिळविली. गेल्या पाच वर्षात मूल पालिका हद्दीत कर्मवीर मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह व स्मारक, प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, क्रीडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना, इको पार्क, आठवडी बाजार, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, पत्रकार भवन, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचे बांधकाम आदी विकास कामे मंजूर झाली असून, यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतिपथावर आहेत, यामुळेच मूल नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आल्याचे येथील नगरसेवकांचे म्हणणे आहे.