सावली तालुक्यात भाजपचा २४ ग्रामपंचायतींवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST2021-01-19T04:30:05+5:302021-01-19T04:30:05+5:30
सावली :एकेकाळी सावली तालुक्यातील ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केलेल्या काॅंग्रेसला अंतर्गत वादाचा फटका बसल्याचे नागरिक म्हणत आहेत. भाजपने ...

सावली तालुक्यात भाजपचा २४ ग्रामपंचायतींवर दावा
सावली :एकेकाळी सावली तालुक्यातील ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केलेल्या काॅंग्रेसला अंतर्गत वादाचा फटका बसल्याचे नागरिक म्हणत आहेत. भाजपने जवळपास २४ ग्रामपंचायतींवर आपला दावा केला आहे, तर काॅंग्रेसने १८, समिश्र ७, एक ग्रामपंचायत अविरोध आलेली आहे.
सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत बोरकुटे यांना केवळ पाच मतांच्या फरकाने विजय मिळविता आला. तर महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष व माजी सरपंच उषा भोयर यांनासुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक ग्रामपंचायतींवर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तरुण व अपक्षांनी बाजी मारली आहे, तर वंचित बहुजन आघाडी व प्रहार संघटनेनेसुद्धा आपले खाते उघडले आहे.
सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी ३ वाजेपर्यंत संपुष्टात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, सहायक अधिकारी सागर कांबळे यांनी जबाबदारी सांभाळली. सावलीचे ठाणेदार कुमारसिंग राठोड व पाथरीचे ठाणेदार सतीश बंसोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली.