पोंभुर्णा तालुक्यात १७ जागांवर भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:49+5:302021-01-19T04:29:49+5:30

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निकालानंतर भाजपने १७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तालुक्यात महत्त्वपूर्ण असलेल्या चिंतलधाबा, जुनगाव, भिमणी, ...

BJP claims 17 seats in Pombhurna taluka | पोंभुर्णा तालुक्यात १७ जागांवर भाजपचा दावा

पोंभुर्णा तालुक्यात १७ जागांवर भाजपचा दावा

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निकालानंतर भाजपने १७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तालुक्यात महत्त्वपूर्ण असलेल्या चिंतलधाबा, जुनगाव, भिमणी, मोहाळा (रै), घाटकुळ या ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून, काॅंग्रेसने घोसरी, देवाडा (बुज), चेकफुटाणा येथे विजय मिळाल्याचे म्हटले आहे. कसरगट्टा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वेळवा, घनोटी तुकुम येथे त्रिशंकू तर काॅंग्रेस तालुका कमिटी अध्यक्षांच्या दिघोरी गावात अपक्षांचा बोलबाला असून, प्रीतिश कुंदावार यांचा पराभव झाला आहे.

तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतीवर माजी सरपंच विलास मोगरकर यांच्या गटाने बाजी मारली तर नवेगाव मोरे येथे काॅंग्रेसने चार तर गोंडवाना गणतंत्र पार्टीने तीन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर आपले वर्चस्व सांगितले आहे.

घोसरी येथील काॅंग्रेसप्रणित रवी मरपल्लीवार यांनी वर्चस्व कायम ठेवल्याने प्रशांत झाडे, जितेंद्र चुदरी, विकास महामंडरे, हेमा सिडाम, सोनी लोढे व निर्मला अर्जुनकर हे विजयी झाले आहेत. जुनगाव येथे राहुल पाल गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

Web Title: BJP claims 17 seats in Pombhurna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.