देशाच्या विकासाकरिता भाजपा सक्षम
By Admin | Updated: April 7, 2016 00:42 IST2016-04-07T00:42:05+5:302016-04-07T00:42:05+5:30
देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्ष सक्षम असून देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे कर्तव्य आहे, ..

देशाच्या विकासाकरिता भाजपा सक्षम
हंसराज अहीर : भाजपाच्या ३६ व्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांना साडी वाटप
राजुरा : देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्ष सक्षम असून देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्वरक व रसायनमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. ते भारतीय जनता पार्टीच्या ३६व्या वर्षापूर्तीनिमित्त राजुरा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
भारतीय जनता पार्टी सक्षम भारताच्या निर्मितीकडे वाटचाल करीत असून येणारा काळ हा विकासाचा व भरभराटीचा राहील, असे मत राजुराचे आमदार अॅड. संजय धोडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी १०० गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी प्रामुख्याने सतीश धोटे, सतीश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मधुकर नरड, भाऊराव चंदनखेडे, सुनील उरकुडे, वामन तुरानकर, भाजपा शहर अध्यक्ष बादल बेले, वाघु गेडाम, मंदा चौधरी, संध्या बाभुळकर, संध्या धोटे, सुरेश धोटे, सुरेश रागीट, दिलीप वांढरे, तिरुपती नल्लाला, मंगेश श्रीराम, अमित जयपूरकर, विजय धानोरकर, अरविंद दूबे, आशिष देवतळे, रवी बुरडकर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन डोहे, बंडू बोढे, रूपेश चिडे, राजू उपलंचीवार, मोहन कलेगुरवार, सचिन मोरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)