बिरसामुंडा शहीद दिन कार्यक्रम

By Admin | Updated: June 9, 2016 01:18 IST2016-06-09T01:18:49+5:302016-06-09T01:18:49+5:30

आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था बाबुपेठच्या वतीने ९ जून रोजी आंबेडकर वॉर्ड शांतीनगर प्रभाग क्र. ३० मध्ये बिरसा मुंडा

Birsamunda martyr day program | बिरसामुंडा शहीद दिन कार्यक्रम

बिरसामुंडा शहीद दिन कार्यक्रम

चंद्रपूर : आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था बाबुपेठच्या वतीने ९ जून रोजी आंबेडकर वॉर्ड शांतीनगर प्रभाग क्र. ३० मध्ये बिरसा मुंडा चौक बाबुपेठ येथे सायंकाळी ७ वाजता बिरसामुंडा यांच्या ११६ व्या शहिद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बिरसा मुंडा यांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला आदिवासी आघाडीचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील येरमे, तुळशिदास ताडाम, अशोक आक्केवार, एकनाथ कनाके, गणेश गेडाम, दयालाल कनाके, विलास मसराम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी आदिवासी समाजबांधवानी शहिद दिन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लता पोरते, संतोषी सिडाम, माणिक आत्राम, गणेश सिडाम, मधुकर सिडाम, नर्मदा सिडाम, गिता मडावी आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Birsamunda martyr day program